सम्राट तायडे - मराठी इन्फॉर्मेशन - विषाणू

विषाणू हा एक अत्यंत सूक्ष्म असा निर्जीव घटक आहे तो इतर सजीव पेशींना संसर्ग करतो. संरक्षक असे प्रथिनांचे कवच व त्यामध्ये जनुकीय घटक अशी सर्वसाधारण विषाणूची मूलभूत रचना असते. प्रथिनांच्या कवचाला कॅप्सिड (capsid) असे म्हणतात. या कॅप्सिडच्या आधारावर विषाणूंसारख्या कणांचे प्रायॉन्स (prions) व व्हायरॉइड्स (viroids) असे वर्गीकरण करतात.





विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शाखेला विषाणुशास्त्र म्हणतात तर या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना विषाणुशास्त्रज्ञ म्हणतात. विषाणू हे पेशीमधील परजीवींप्रमाणे आहेत कारण की ते त्यांच्याप्रमाणे पेशीबाहेर प्रजनन करू शकत नाहीत. परंतु ते पेशीमधील परजीवींप्रमाणे पूर्णपणे सजीवही नाहीत. ते प्राणी, वनस्पती तसेच जीवाणू (bacteria) यांच्यासह जवळपास सर्व सजीवांना संसर्ग करू शकतात. जे विषाणू जीवाणूंना संसर्ग करतात त्यांना बॅक्टेरियोफेग (bacteriophage) असे म्हणतात.

विषाणू (Virus) हे सजीव आहेत की नाहीत हे विवादास्पद आहे. बरेच विषाणुशास्त्रज्ञ त्यांना सजीव मानत नाहीत कारण की ते सजीवांच्या व्याख्येच्या सर्व कसोट्यांवर उतरत नाहीत. त्याशिवाय विषाणूंना पेशीभित्तिकाही नसते तसेच ते स्वतः चयापचय प्रक्रियाही करत नाहीत. जे त्यांना सजीव समजतात त्यांच्याकरीता ते थियोडोर श्वानने मांडलेल्या पेशी सिद्धांताला (Cell Theory) अपवाद आहेत, कारण विषाणू हे पेशींचे बनलेले नसतात.

विषाणूंचे वर्गीकरण

  1. वनस्पती विषाणू
  2. प्राण्यांमधील विषाणू
  3. बॅक्टरिओफेजेस
  4. मायकोव्हायरसेस


विषाणूंमुळे होणारे  रोग
  1. एड्स
  2. कांजण्या
  3. कोरोना
  4. गालफुगी
  5. गोवर
  6. देवी
  7. पोलिओ
  8. रूबेला
  9. विषमज्वर
  10. हेपॅटायटिस
  11. स्वाईन फ्लू

कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हातभार लावा!
सध्या भारत व जगभर पसरत असलेल्या कोव्हिड-१९ (कोरोना व्हायरस)चा संसर्ग एकमेकांना होऊ न देण्यासाठी काळजी घ्या. यासाठी
१. दोन व्यक्तीमध्ये १ मीटर अंतर राखून व्यवहार करा.
२. आपली थुंकी हवेत उडू देऊ नका.
३. रस्त्यात किंवा इतर ठिकाणी थुंकू नका.

४. स्थानिक सरकारकडून घालून दिलेल्या सगळ्या नियम व कायद्यांचे काटेकोर पालन करा.








 Website : samrattayade.com
Blogspot : samrattayade.blogspot.com
linkdin/GitHub : samrattayade
 Fb/gmail : mr.samrattayade
 Insta/twtr/pin : samrat_tayade

 Call /sms / wa : 7558389354





Tags
samrat tayade,samrat_tayade,samrattayade
hashtags
#samrattayade  #samrat_tayade #विषाणू  

Post a Comment

0 Comments